Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी आज मिळणार प्रवेशपत्र

पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार आ

Nagpur : गणेशपेठ आगारातील कर्मचारी संपात सहभागी… | ST Bus Strike | Maharashtra News (Video)
काम करत नसल्यामुळे मंडळ अधिकाऱ्याला मारहाण | LOKNews24
मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडलं

पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र बुधवारी (5 जुलै) सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रांची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येऊ नये. प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय, माध्यम बदल असल्यास संबंधित दुरुस्त्या विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाला सादर करावी. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS