Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रीया सुरू

नाशिक - शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक नाशिक यांच्या अधिनस्थ नाशिक जिल्ह्यात सुरू होणाऱ्या मागासवर्गीग मुला व मुली

राज्यातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत
शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता ममतांची साथ
फालुदा खाल्याने कोतुळमध्ये अनेकांना विषबाधा

नाशिक – शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक नाशिक यांच्या अधिनस्थ नाशिक जिल्ह्यात सुरू होणाऱ्या मागासवर्गीग मुला व मुलींच्या शासकीय वसतीगृहांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन  इतर मागस बहुजन कल्याण, नाशिकचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

मुला व मुलींचे अशा 2 शासकीय वसतीगृहांमध्ये रिक्त जागंवर  ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या इमाव, विभाभज, विमाप्र, अनाथ, दिव्यांग, आ.दु.घ प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित केल्यानुसार 12 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, तदनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेता येईल.

वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवास, दरमहा निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्यासह भोजनभत्ता डिबीटी रक्कम, गणवेश ड्रेसकोड रक्कम इत्यादी व इतर अनुषंगिक सोयी- सुविधा शासनामार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज  सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नाशिक यांच्या कार्यालयातून प्राप्त करून व परिपूर्ण भरून आवश्यक माहितीसह सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नाशिक कार्यालय अथवा सामाजिक न्याय भवन, नाशिक पुणे रोड नाशिक येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

COMMENTS