Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत-जामखेडमध्ये प्रशासन सुस्त

आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा सुरू

जामखेड ः कर्जत-जामखेड तालुक्यात आ रोहित पवार यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा 20 गावात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. तालुक्यात यंदा पावसाचे

गाव दत्तक घेऊन आदर्शगावची निर्मिती करावी
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाचे सह्यांचे अधिकार काढले
माणिकपणे आणि माणुसकीने काम केल्याचे समाधान मोठे ः शंकरराव परदेशी

जामखेड ः कर्जत-जामखेड तालुक्यात आ रोहित पवार यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा 20 गावात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उन्हाच्या कडाक्याबरोबरच पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जेव्हा जेव्हा पाणी टंचाई जाणवली आ रोहित पवार यांनी शासकीय मदतीची वाट न बघता टँकर सुरू केले आहेत.
नजीकच्या काळात रोहित पवार यांनी पाण्यावर मोठे काम केले आहे. आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर 1 मार्चपासून कुकडीचं आवर्तनदेखील सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील करपडी, डिकसळ, राशीन (शेटे वस्ती, मोढळे वस्ती, मोहिते वस्ती, बरबडे वस्ती), टाकळी खंदेश्वरी, गोयकरवाडा, सोनाळवाडी (सौताडे वस्ती, जाधव वस्ती), तळवडी, पठारवाडी, शिंदेवाडी, परीटवाडी, चांदे खूर्द, कापरेवाडी, सितपूर आणि बारडगाव सुद्रिक या 15 गावांमध्ये तर जामखेड तालुक्यातील अरणगाव, पारेवाडी, बर्‍हाणपूर, पाढंरेवाडी-गीतेवाडी. आणि दिघोळ-रंधवे वस्ती या 5 गावात आ रोहित पवार यांच्यणी माध्यमातून पुरवठा सुरु आहे. पाण्याची सोय केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येतं आहे.

कोट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी लोकांच्या संपर्कात असल्याने आपल्याला ही सेवा देता येत आहे.  पावसाळा आणखी दूर असल्याने येणार्‍या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी आत्ताच सज्ज व्हायला हवे तसेच पाण्यासाठी राजकारण न करता सामान्य नागरिकांसाठी आणि शेतकर्‍यांसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे.
रोहित पवार, आमदार कर्जत- जामखेड

COMMENTS