Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटीची स्थापना

मुंबई ः ठाकरे गटाचे नेते आणि माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण दिशा सालियान मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण र

जनतेच्या पैशातून सरकारचे परदेश दौरे ः आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल
आदित्य ठाकरे अन् , अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार

मुंबई ः ठाकरे गटाचे नेते आणि माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण दिशा सालियान मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेत त्यांच्यावर यापूर्वीच टीका केली आहे. मात्र आता दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने या संदर्भातील चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भातील ऑर्डर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. एकिकडे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या असताना दुसरीकडे आदित्य ठाकरे मात्र, दुबईला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आदित्य ठाकरे हे दुबईत एका जागतिक परिषदेसाठी गेलेले आहेत. संयुक्त राष्ट्रांची वार्षिक जागतिक हवामान परिषद दुबईत सुरु आहे. या परिषदेत आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. बुधवारी आदित्य ठाकरे या परिषदेस उपस्थित होते. विविध चर्चा सत्रांदरम्यान महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका देखील मांडली.

COMMENTS