Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्राधान्यांने सोडवा

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा अधिकार्‍यांना सज्जड दम

लातूर/प्रतिनिधी ः पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात पाणी देऊ पिके जगविण्याची आणि त्यात पुन्हा उच्च दाबाने व अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने उभी प

अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाई रकमेत दुपटीने वाढ
शिवसेनेचे ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत ; ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात?
लाठीहल्ल्याप्रकरणी सरकारची माफी

लातूर/प्रतिनिधी ः पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात पाणी देऊ पिके जगविण्याची आणि त्यात पुन्हा उच्च दाबाने व अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने उभी पिकं डोळ्यांदेखत जळताना पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकरी बांधवांवर ओढवली आहे. महावितरणकडून शेतकर्‍यांना येत असलेल्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील सरपंच व महावितरणचे अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेतली. या बैठकीतून आमदार पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच फोन लावला. तर फडणवीसांनी देखील थेट इशारा देत, शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्याचे आदेश दिले. वीज पुरवठा खंडीत करून बळीराजाला विनाकारण त्रास देवू नका, नाही तर तुम्हाला थेट घरी पाठवेन, असा सज्जड दम फडणवीसांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना भरला आहे.
 मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात गेल्या एका महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पिकं करपण्यास सुरुवात झाली आहे. हातची पिकं जाण्याची वेळ आल्याने शेतकर्‍यांसमोर जगण्या-मरण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परंतु विहिरी आणि बोअरच्या पाण्यावर पिकं जगवण्याचा संघर्ष बळीराजाकडून सुरू आहे. मात्र महावितरण कंपनीकडून सातत्याने वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यानंतर संतप्त शेतकर्‍यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर आमदार पवार यांनी बैठकीतूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. त्यानंतर फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना खडेबोल सुनावत तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. शेतकर्‍यांसमोर आमदार अभिमन्यू पवार यांनी फडणवीसांना फोन केला होता. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार हे पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते बसवराज पाटील यांचा पराभव करत औसामध्ये भाजपचा झेंडा फडकावला होता. अभिमन्यू पवार यांची फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळे वीज प्रश्‍न मार्गी लागल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

COMMENTS