Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यायालयाला अतिरिक्त मजला; न्यायाधीशांसाठी नवीन कक्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन; कर्जतच्या न्यायव्यवस्थेला दिलासा कर्जत : येथील न्यायालयीन इमारतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण

काळविटाच्या शिकारीतील गुन्हेगाराची माहिती देणाऱ्याला बक्षीस : सागर केदार
टेलर दुकानाला भीषण आग ; साडेचार लाखांचे नुकसान
कर्जतमधील ६ दुकाने सील नगरपंचायतची धडक कारवाई ; व्यवसायिक संतप्त

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन; कर्जतच्या न्यायव्यवस्थेला दिलासा

कर्जत : येथील न्यायालयीन इमारतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, विद्यमान न्यायालयाच्या इमारतीवर अतिरिक्त मजला बांधण्यात येणार आहे. न्यायाधीशांसाठी नवीन न्यायालयीन कक्ष उभारण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना लेखी पत्राद्वारे दिली असून, ही माहिती कर्जत तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्जत येथील न्यायालयीन इमारतीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. कैलास शेवाळे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. विलास गुंजाळ तसेच कर्जत बार असोसिएशनचे सचिव ऍड. अविनाश मते उपस्थित होते.

कर्जत येथे वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाले असून लवकरच ते कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या भव्य न्यायालयीन इमारतीवर दुसरा मजला बांधण्यात यावा तसेच दोन स्वतंत्र न्यायाधीश कक्ष उभारण्यात यावेत, अशी मागणी ऍड. कैलास शेवाळे यांनी यापूर्वी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनीही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन कर्जत न्यायालयासाठी अतिरिक्त मजला व न्यायाधीश कक्षासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उच्च न्यायालयाकडून प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यानंतर विद्यमान इमारतीवर अतिरिक्त मजला बांधण्याच्या प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

या निर्णयामुळे कर्जत न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाचा प्रश्न सुटला असून न्यायालयीन सुविधांचा विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती ऍड. शेवाळे यांनी दिली.

COMMENTS