Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवड सुषमा अंधारेंच्या प्रतिमेस जोडेमारो

चांदवड शिवसेना महीला आघाडी आक्रमक

नाशिक प्रतिनिधी - उबाठा गटाच्या सुषमाताई अंधारे यांच्या बेतल वक्तव्याच्या व बिनबुडाच्या आरोपाच्या निषेधासाठी चांदवड शहर प्रभाग क्रमांक 6 गाडगेबाब

लघुपट व माहितीपट महोत्सवात ‘महासत्ता’, विद्यार्थी गटात ‘उंबरा’ ने मारली बाजी
मध्यप्रदेशात चौघांचा नदीत बुडून मृत्यू
पुण्यात 75 वर्षीय महिलेचा विनयभंग

नाशिक प्रतिनिधी – उबाठा गटाच्या सुषमाताई अंधारे यांच्या बेतल वक्तव्याच्या व बिनबुडाच्या आरोपाच्या निषेधासाठी चांदवड शहर प्रभाग क्रमांक 6 गाडगेबाबा चौक परीसरात शिवसेना महीला आघाडी व चांदवड शहर व तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करत उबाठा गटाच्या सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

         नासिकरोड हद्दीतील शिंदेगावात पोलीसांनी ड्रग्जचे दोन कारखाने उध्वस्त करत, दोन संशयीतांना अटक केली.या संशयीतांचा थेट संबंध पालकमंत्री यांच्याशी जोडण्यात आला.सुषमाताई अंधारे यांनी बिनबुडाचा आरोप करत दादा भुसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले.याच बिनबुडाच्या आरोपाच्या विरोधात आज नासिक जिल्ह्यात पडसाद उमटले.शिवसेना चांदवड  तालुका व शहर महीला आघाडी यांचेकडुन सुषमा अधारे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करत तिव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.

       या आंदोलनाच्या वेळी महीला   आघाडी जिल्हाप्रमुख रोशनी ताई कुंभार्डे शिवसेनेच्या माजी उपनगराध्यक्षा नगरसेविका कविता संदीप उगले पुनम बागरे मीनाताई सानप सुनिता उगले सगिता वाघ मिना जोशी लक्ष्मीबाई सानप पुनम बागुल गौरी आहिरराव योगिता बागुल रश्मी शिरसाठ अनिता पवार  रनजिता वाघ जिजा गायकवाड आईनुर काकर रेशमा पठाण जिजाबाई जाधव शितल परदेशी वदना पवार सोनाली खैरे आदींसह महिला उपस्थित होत्या

COMMENTS