Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाचखोरीच्या आरोपानंतर अदानींचे शेअर कोसळले

मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर पुन्हा एकदा अदानी समूह संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. अदानी समूहाला अमेरिकेत मोठा झटका बसला असून, गौतम अदानीसह 7

राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेतेपद
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन मंत्र्यांचा सहभाग
कोपरगावात गीत गायन स्पर्धा उत्साहात

मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर पुन्हा एकदा अदानी समूह संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. अदानी समूहाला अमेरिकेत मोठा झटका बसला असून, गौतम अदानीसह 7 जणांवर 2 अब्ज डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप आहे. अदानी समूहातील गौतम अदानीसह 7 जणांनी अमेरिकेतील सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकार्‍यांना 250 दशलक्ष डॉलर्स लाच दिल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर गुरूवारी अदाणी समूहाच्या शेअरमध्ये जवळपास 20 टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, अमेरिकन कोर्टाने गौतम अदानी यांनी कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी आणि ते लपवण्यासाठी 250 दशलक्ष डॉलर्स अर्थात 2 हजार 236 कोटी रूपये लाच दिल्याचा आरोप केला आहे. हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रीन एनर्जी आणि इतर कंपन्यांशी संबंधित आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन यांनी अदानी समूहाचे काही अधिकारी आणि गौतम अदानी यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवर हे आरोप केले आहेत. या आरोपात गौतम अदानी यांनी सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारत सरकारला 250 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचे म्हटले आहे. या आरोपात अदानी समूहाने अमेरिकन गुंतवणूकदारांकडून भांडवल उभे करून ते लपविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात सागर अदानी, विनीत अदानी, इंडिया रिन्यूएबल्स-एनर्जी कंपनी यांनाही आरोपी सांगण्यात आले आहे.

COMMENTS