Homeताज्या बातम्यादेश

अदानी समूहाला ‘सर्वोच्च’ क्लीन चीट  

सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सप्रे समितीचा अहवाल सादर

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः हिंडेनबर्ग अहवालामध्ये अदानी समूहावर ताशेरे ओढत अनेक सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर अदानी समूहाचे शेअर बाजार धाडकन कोसळत

सर्वेक्षणाला दांडी मारणार्‍या 130 कर्मचार्‍यांना नोटीसा
महेश कोठारे यांनी बौध्द समाजाची जाहिर माफी मागितली
नवाब मलिकांची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई l LOK News 24

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः हिंडेनबर्ग अहवालामध्ये अदानी समूहावर ताशेरे ओढत अनेक सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर अदानी समूहाचे शेअर बाजार धाडकन कोसळत, प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. याप्रकरणी काँगे्रसने जेपीसी समितीची मागणी केली होती, तर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी न्या. सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर केला असून, यात अदानी समूहाची नियामक व्यवस्था फोल ठरल्याचा निष्कर्ष अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात काढता येणार नाही असे म्हणत अदानी समूहाला क्लीन चीट दिली आहे.
अदानी समुहाने कुठलीही आर्थिक माहिती लपवली नसल्याचे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या 173 पानी अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. अदानी समूहाच्या समभागाची सेबी ऑक्टोबर 2020 पासून तपास करीत आहे.पंरतु, अद्याप समूहाच्या बाजूने अथवा विरोधात कुठलेही निर्णायक पुरावे मिळाले नसल्याचे समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्‍वास डळमळीत झाल्याने पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये समूहाच्या समभागात मोठी अस्थिरता दिसून आली होती,असे देखील अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.अदानी समुहात गुंतवणूक केलेल्या 13 विदेशी कंपन्यांचा प्रवर्तकासोबत संबंध असावा, अशी शंका सेबीला आहे, अशी टिप्पणी समितीने केली आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती ए.एम.सप्रे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत न्या.जे.पी.देवधर, ओपी भट, एम.व्ही.कामथ, नंदन नीलकणी तसेच सोमशेखर सुंदरेशन यांचा समावेश होता.

शेअर्स वधारले – सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीकडून दिलासा मिळाल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स शुक्रवारी दुपारच्या सत्रात सुमारे 4 टक्क्यांपर्यंत वधारले. बीएसईवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर 3.92 टक्के वाढून 1,962 रुपयांवर पोहोचला. याआधी हा शेअर 1,888 रुपयांवर बंद झाला होता. मात्र, यंदा हा शेअर 49 टक्क्यांनी खाली आला आहे. एका वर्षात अदानी एंटरप्रायजेसचा शेअर 7.41 टक्क्यांनी घसरला असतांना, सर्वोच्च न्यायालयाच्या या अहवालानंतर हा अदानी समूहाला मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे.

बेकायदेशीर गुंतवणुकीचे पुरावे मिळाले नसल्याचा दावा – न्या. सप्रे समितीला प्रथमदर्शनी अदाणी समूहाच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. विशेष म्हणजे सेबीला अदाणी समूहाच्या शेअर्सच्या किमतीतील बदलाची पूर्ण माहिती असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आला असून, त्यात अदाणी समूहाने शेअरच्या किमतींमध्ये कोणत्याही प्रकारे फेरफार केला नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. समितीच्या अहवालानुसार अदाणी समूहाच्या कंपन्यांमध्ये बेकायदेशीर गुंतवणुकीचे पुरावे मिळालेले नाहीत, तसेच त्यांच्याकडून गुंतवणुकीत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नसल्याचा दावा केलेला आहे.

COMMENTS