Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री सरिता मेहेंदळे लवकरच होणार आई

मुंबई प्रतिनिधी - गेल्या काही महिन्यात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री मातृत्वाचा आनंद उपभोगत आहेत. तर काही अभिनेत्री लवकरच आई होणार आहेत

जगातील सर्वात वृद्ध महिलेचे वयाच्या 118 व्या वर्षी निधन
उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथे तूर पीक पाहणी कार्यक्रम संपन्न | LOKNews24
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या घरात चोरी

मुंबई प्रतिनिधी – गेल्या काही महिन्यात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री मातृत्वाचा आनंद उपभोगत आहेत. तर काही अभिनेत्री लवकरच आई होणार आहेत. आता यामध्ये ‘भागो मोहन प्यारे’ या मराठी मालिकेतील अभिनेत्रीचेही नाव जोडले गेले आहे. या मालिकेतील अभिनेत्री सरिता मेहेंदळेने अलीकडेच ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. अभिनेत्रीने तिच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत. सरिताने तिचा नवरा सौरभ जोशीसोबतचे फोटो शेअर करत प्रेग्नन्सीची घोषणा केली.आई-बाबा होणार असल्याचा आनंद यावेळी सौरभ आणि सरिता यांच्या फोटोमध्ये स्पष्ट दिसतो आहे. शिवाय अभिनेत्री या फोटोंमध्ये तिचा बेबी बम्पही फ्लाँट करतेय. तिने पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने हे डोहाळे जेवण केले. फुलांच्या दागिन्यांमध्ये सजलेली सरिता खूपच सुंदर दिसत होती. बाळाला भेटण्यासाठी ती सरिता आणि सौरभचे कुटुंबीयही फार उत्सुक आहेत. दरम्यान सरिताच्या या खास दिवशी कलाविश्वातीलही काही मंडळी उपस्थित होती

COMMENTS