Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘जय संतोषी माँ’ फेम अभिनेत्री बेला बोस यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचा जन्म 18 एप्रि

ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे
राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा, जामीन मंजूर
उपेंद्र कुशवाहांनी सोडली नितीश कुमारांची साथ

ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1941 रोजी कोलकाता येथे झाला. बेला यांनी 1950 ते 1980 दरम्यान 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी जीने की राह आणि जय संतोषी मां सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये चमकदार अभिनय केला. बेला बोस यांची पहिली प्रमुख भूमिका वयाच्या 21 व्या वर्षी 1962 साली आलेल्या ‘सौतेला भाई’ चित्रपटात होती. यात त्यांच्या अपोजिट गुरु दत्त दिसले. या अभिनेत्रीला राज कपूरसोबत मोठा ब्रेक मिळाला. ‘मैं नशे में हूं’ मध्ये त्यांनी राज कपूरसोबत डान्स नंबर केला होता. हा चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता.

COMMENTS