Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेता गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

उत्तर पश्‍चिम मुंबईतून निवडणूक लढण्याचे संकेत

मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गोविंदा आहुजा यांनी गुरूवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख

अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरूणाचा अत्याचार
 ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन रुग्णालयात दाखल
अजित दादा म्हणतात… महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत, सरकार पडण्याचा प्रश्नच नाही…

मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गोविंदा आहुजा यांनी गुरूवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांचे पक्षात स्वागत केले. गोविंदा यांना उत्तर पश्‍चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असताना गोविंदा यांनी याआधी 2004 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव करून ते ’जायंट किलर’ ठरले होते. मात्र, खासदार म्हणून त्यांची कारकीर्द सुमार ठरली होती. संसदेकडे ते क्वचित फिरकले होते. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. परिणामी ते राजकारणापासून दूर गेले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी नवी इनिंग सुरू केली आहे. गोविंदा यांना मोदी सरकारचे आणि राज्यातील सरकारचे काम आवडले. त्यातून प्रभावित होऊन गोविंदा हे आमच्यासोबत आले आहेत. ते कुठल्या अपेक्षेने आलेले नाहीत. त्यांनी निवडणुकीचे तिकीट मागितलेले नाही, असेही यावेळी शिंदे यांनी यावेळी सांगितले. गोविंदा हे लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक असतील, असेही शिंंदे म्हणाले. मी आजच्या दिवशी पक्षात प्रवेश करणे हा दैवी संकेत आहे. 2004 ते 2009 राजकारणात सक्रिय होतो. बाहेर पडल्यानंतर असे वाटले होते पुन्हा या क्षेत्रात देणार नाही. मात्र, मधल्या 14 वर्षाच्या वनवासानंतर जिथे रामराज्य आहे, त्याच पक्षात आलो. तुम्ही जो विश्‍वास दाखवला, तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, असा विश्‍वास गोविंदा यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS