मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यातील अनाधिकृत बांधकामावर हातोडा पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण मुंबई
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यातील अनाधिकृत बांधकामावर हातोडा पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यात अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा राणे यांनी दिलेला अर्जही अपुर्या कागदपत्रांमुळे पालिकेने फेटाळला आहे. त्यामुळे शेवटची संधी म्हणून पुन्हा 15 दिवसाची अंतिम नोटीस बजावून कागदपत्र सादर करावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासंदर्भात राणे यांनी पालिकेकडे अर्ज केला होता. त्यानुसार पालिकेने कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र सीआरझेड 2 मध्ये अंतर्गत केलेल्या बांधकामाबद्दल कोणतीही माहिती पालिकेला सादर केली नाही. कागदपत्रांमध्ये वाढीव बांधकामाचा उल्लेख नाही. अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्ता कर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेटसह अन्य कागदपत्रे पुरावे जोडलेले नसल्याचे पालिकेच्या अंधेरी के पश्चिम विभागातील वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिका अधिनियम 351(1)ची नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेच्या के पश्चिम विभागाने 21 फेब्रुवारी राण्यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाची तपासणी केली होती. बंगल्यातील सर्व मजल्यावर मंजूर आराखडा व्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे दिसून आल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS