दापोलीतील साई रिसॉर्टवरील कारवाई थांबवली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दापोलीतील साई रिसॉर्टवरील कारवाई थांबवली

सोमय्यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करणार ः परब

रत्नागिरी - शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या कथित मालकीचे दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्यास अखेर प्रशासनाने मंगळवारी

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.
अजित पवार प्रकरणात आता ईडी देखील चौकशी सुरू करणार (Video)
सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार- नवाब मलिक (Video)

रत्नागिरी – शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या कथित मालकीचे दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्यास अखेर प्रशासनाने मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुरुवात केली होती. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे न्यायालयाने काम जैसे थै ठेवण्याचे निर्देश दिल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा भ्रमनिरास झाला. सोमय्याही साई रिसॉर्टवर हजर सोमय्या स्वत: मोठा हातोडा घेऊन दापोलीत दाखल झाले होते. मात्र या बांधकाम पाडापाडीला स्थगिती दिल्यामुळे सोमय्यांचा भ्रमनिरास झाला.
दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याची कारवाई तुर्तास थांबवण्यात आलेली आहे. न्यायालयाने या प्रकरणी ‘जैस ेथे’चे आदेश दिले आहेत. मंगळवारी सकाळीच भाजपाचे नेते किरीट सोमय्या या रिसॉर्टवर पोहोचले होते. तसेच प्रतिकात्मक हातोडा हातात घेत त्यांनी या रिसॉर्टच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे, सांगितले होते. दरम्यान, सोमय्यांच्या याच भूमिकेविरोधात उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल परब आक्रमक झाले आहेत. माझी बदनामी केली जात आहे. मी या रिसॉर्टचा मालक नाही, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली आहे. तसेच मी परब यांच्याविरोधात फौजदारी स्वरुपाची तक्रार दाखल करणार आहे, अशी माहितीदेखील परब यांनी दिली आहे. ते आज (22 नोव्हेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
साई रिसॉर्ट परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस व प्रशासनाने साई रिसॉर्टच्या पाडकामाची तयारी सकाळीच पूर्ण केली होती. दापोली येथे माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले, साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. बनावट कागदपत्रे सादर करून, बांधकाम करणे, तसेच पर्यावरणाची हानी करण्याचे त्यांच्यावर प्रमुख आरोप आहे. कोविड काळात कोणत्याही परवानग्या न घेता, अनाधिकृतपणे रिसॉर्ट बांधकाम करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी परब यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सोमय्यांनी सांगितले की, या रिसॉर्टप्रकरणी दुसरा गुन्हा सदानंद कदमांविरोधात दाखल झाला आहे. कोविड काळात त्यांनी अनधिकृतपणे रिसॉर्टचे बांधकाम केले, असा आरोप आहे. या गुन्ह्यात आता अनिल परब यांचाही समावेश करण्यात आला आहे. तर, तिसरा गुन्हा पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्टचे बांधकाम केले म्हणून भारत सरकारनेच दाखल केला आहे. पहिल्या गुन्ह्यात अनिल परबांना जामीन घ्यावा लागला आहे. सोमय्यांनी सांगितले की, ठाकरे गटाचे भ्रष्टाचाराचे स्मारक आजपासून पाडण्यास सुरुवात होणार आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यानंतर आता तुरुंगात जाण्याची अनिल परब यांची वेळ आली आहे, असा इशाराही सोमय्यांनी दिला.

अनिल परब यांच्यावर 3 गुन्हे दाखल – दापोली येथे माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले, साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा दापोली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यानुसार, अनिल परब यांनी ग्रामपंचायतीला बनावट कागदपत्रे देऊन 15, 800 स्क्वेअर फुटचे हे रिसॉर्ट स्वत:च्या नावावर करून घेतले. सोमय्यांनी सांगितले की, या रिसॉर्टप्रकरणी दुसरा गुन्हा सदानंद कदमांविरोधात दाखल झाला आहे. कोविड काळात त्यांनी अनधिकृतपणे रिसॉर्टचे बांधकाम केले, असा आरोप आहे. या गुन्ह्यात आता अनिल परब यांचाही समावेश करण्यात आला आहे. तर, तिसरा गुन्हा पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्टचे बांधकाम केले म्हणून भारत सरकारनेच दाखल केला आहे. पहिल्या गुन्ह्यात अनिल परबांना जामीन घ्यावा लागला आहे.

COMMENTS