Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खटाव तालुक्यात गौण खनिज उत्खनन प्रकरणी जेसीबीसह दोन ट्रॅक्टरवर कारवाई

वडूज / प्रतिनिधी : खटाव नजीक अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍या वाहनांवर स्वतः तहसीलदार किरण जमदाडे यांनी जाऊन छापा टाकला. या कारवाईत एक ज

पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत-जास्त झाडे लावावीत : ना. रामराजे नाईक-निंबाळकर
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांचे आवाहन
विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे ही जयंत पाटील यांची विकृत संस्कृती : पृथ्वीराज पवार

वडूज / प्रतिनिधी : खटाव नजीक अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍या वाहनांवर स्वतः तहसीलदार किरण जमदाडे यांनी जाऊन छापा टाकला. या कारवाईत एक जेसीबी, गौण खनिजासह दोन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. तहसीलदार किरण जमदाडे यांनी केलेल्या या कारवाईने गौण खनिज उत्खनन करणार्‍या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील काही भागात चोरट्या पध्दतीने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तहसीदार जमदाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे तहसीलदार यांनी खटाव या ठिकाणी जाऊन या वाहनांवर कारवाई केली केले.
कारवाईची अधिक माहिती अशी की, खटाव गावच्या हद्दीत जेसीबी मशीनच्या सहाय्याने अवैध गौण खनिज उपसा व ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक होत असल्याचे तहसीलदार यांच्या पथकाला समजले. यानंतर तहसीलदार याठिकाणी पोहचले. असता एकजेसिबी मशीन दोन ट्रॅक्टर अवैध गौण खनिजाची वाहतूक करत असल्याचे मिळून आले.
अनेक वेळा अवैध गौण खनिज उत्खनन होत असलेल्या संबंधित क्षेत्राचे मालक अवैद्य वाळू उपशाबाबत प्रशासनाला माहिती देत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे उत्खनन व वाहतूकीला रस्ता करून देणे, यामध्ये त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असे तहसिलदार किरण जमदाडे यांनी सांगितले आहे.

COMMENTS