Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून नवरा, सासु सासरे यांची निर्दोष मुक्तता

बीड प्रतिनिधी - आरोपी नामे दत्ता बाबा गायकवाड, बाबा हरिभाऊ गायकवाड व जनाबाई बाबा गायकवाड, रा कोतन, ता. पाटोदा, जि.बीड यांनी मयत नामे प्रतिक्षा  

रेस्टॉरंटमधील माऊथ फ्रेशनरमुळे ५ जणांना रक्ताच्या उलट्या
नवरात्र उत्सवात केडगाव देवीच्या मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी
सुधा मुर्ती गुरू शुक्राचार्य महाराजांच्या चरणी लिन

बीड प्रतिनिधी – आरोपी नामे दत्ता बाबा गायकवाड, बाबा हरिभाऊ गायकवाड व जनाबाई बाबा गायकवाड, रा कोतन, ता. पाटोदा, जि.बीड यांनी मयत नामे प्रतिक्षा  दत्ता गायकवाड हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून बीड येथील मा. जिल्हा सत्र न्यायाधीश क्र. 4 आर. एस. पाटील  यानी सर्व आरोपींची   निर्दोष मुक्तता केली.
सतिष भिमराव थेटे, रा. बार्शी नाका, बीड यांनी पोलीस स्टेशन, अंमळनेर येथे तक्रार दिली की, त्यांची मुलगी नामे प्रतिक्षा हिचे लग्न सन 2012 मधे कोतन येथील दत्ता बाबा गायकवाड याचे सोबत झाले होते. तेव्हांप सून ती सासरी नांदत होती. वैवाहिक संबंधातून प्रतिक्षा हिस –4- अपत्ये होती. सुरुवातीचे काही दिवस आरोपींनी तिला चांगले नांदवले व त्यानंतर तिचा नवरा, सासरा, सासु हे तिला ट्रक घेण्यासाठी तिच्या आई- वडीलाकडून चार लाख रूपये घेऊन ये असे म्हणून प्रतिक्षा हिस मारहाण करून तिला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करू लागले. मुलगी प्रतिक्षा ही आल्यानंतर फिर्यादी व इतरांना त्रासाबाबत सांगत होती. आरोपींना वेळोवेळी समजून सांगण्याचा देखील प्रयत्न केला व पतीस काही पैसेही दिले. परंतु काही दिवसांनी प्रतिक्षा हिच्यावर संशय घेऊन पुन्हा सतत मारहाण करून तिचा छळ आरोपी करू लागले. त्यानंतर दि. 14-02 2021 रोजी प्रतिक्षा हिने विषारी औषध घेतले, त्यावेळी तिला जामखेड येथील ओम हॉस्पीटल येथे अ‍ॅडमीट केले व उपचार चालू असताना प्रतिक्षा ही दि. 17-02-2021 रोजी मरण पावली. वर नमूद केल्याप्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीचे विरुद्ध अंमळनेर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.31 / 2021 कलम 498 (अ), 306, 323, 504 सह 34 भा. दं. वि. नुसार नोंद करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास करून पोलीसांनी आरोपीद विरुद्ध दोषारोप दाखल केले. सदरील प्रकरणाची सुनावणी  जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 4. बीड येथे सत्र प्रकरण क्र. 109/2021 नुसार झाली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण साक्षीदार तपासण्यात आले परंतु आरोपीचा बचाव व युक्तीवाद ऐकून सरकार पक्षाने आरोप सिद्ध न केल्यामुळे मौजे कोतन, ता. पाटोदा, जि.बीड येथील आरोपी नामे दत्ता बाबा गायकवाड, दाबा हरिभाऊ गायकवाड व जनाबाई बाबा गायकवाड, रा. कातन, ता. पाटोदा, जि.बीड यांची मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 4. बीड यांनी दि.02-05-2023 रोजी सबळ पुराव्या अभावी सदर प्रकरणातून निर्दोष मुक्तता काली.सदर खटल्यामधे आरोपीचे वतीने अ‍ॅड. एन. एन साबळे यांनी काम पाहिले, त्यांना अ‍ॅड. आर. एस. पोकळे, अ‍ॅड. प्रिती नवले व अ‍ॅड. मोहसीन पिंजारी  यांनी सहकार्य केले.

COMMENTS