Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास 

अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

  यवतमाळ प्रतिनिधी - अल्पवयीन मुलीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणाी आरोपीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल  अतिरिक्

अहमदनगर जिल्ह्यातील 16 आदर्श शाळांना शासनाच्या विकास निधीची प्रतीक्षा
नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणारच : भाऊ कोरगावकर
नगर अर्बनच्या त्या ठेवीदारांनी न्यायालयात जाण्याची गरज

  यवतमाळ प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणाी आरोपीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल  अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी दिला. सज्जाद शेख अकबर शेख, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 17 ऑगस्ट 2019 रोजी अल्पवयीन मुलगी मध्यरात्री उठून शौचास गेली. त्यावेळी तरुणाने तिला वाईट उद्देशाने पकडले. तिने आरडाओरड केल्याने नातेवाईक बाहेर आले. तिने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे सज्जाद शेख याच्याविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद करून तपास अधिकार्‍यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. मारहाणप्रकरणी तीन महिने कारावास व विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील निती दवे यांनी बाजू मांडली.

COMMENTS