यवतमाळ प्रतिनिधी - गतिमंद मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर अत्याचार करणार्या आरोपीला 11 वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड, अशी श
यवतमाळ प्रतिनिधी – गतिमंद मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर अत्याचार करणार्या आरोपीला 11 वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. हांडे यांनी दिला.विलास पुसनाके (वय 42, रा. तरोडा, ता. घाटंजी), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 11 ऑक्टोबर 2028 रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान गतिमंद मुलगी घरी एकटीच असताना विलास पुसनाके याने घरात शिरून अत्याचार केला. ही घटना लक्षात येताच या प्रकरणी पीडितेच्या आईने पारवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक युवराज राठोड यांनी या प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविस्ट केले. न्यायालयाने पीडितेची आई, भाऊ, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांची साक्ष व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील विजय तेलंग यांनी बाजू मांडली.
COMMENTS