देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील शिलेगाव येथे 14 मे रोजी रात्रीच्या दरम्यान काही तरुणांनी विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन त्य
देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील शिलेगाव येथे 14 मे रोजी रात्रीच्या दरम्यान काही तरुणांनी विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन त्याचे हाथपाय बांधुन मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याचा खून करण्यात आला. सदर घटना 15 मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून राहुल जगधने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुरी न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
राहुरी तालूक्यातील शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकर्याच्या विहिरीत दि. 15 मे रोजी सकाळी लाकडी दांडे, चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सुरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, विकास साळवे, रोहित पालवे, संतोष राठोड, भाऊसाहेब शिरसाठ, गणेश लिपने आदि पोलिस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने बाजेवर ठेवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव, वय 30 वर्षे, राहणार आरडगाव, बिरोबानगर, याचा असल्याचे निष्पन्न झाले. विजय जाधव हा दि. 14 मे रोजी कामावर गेला होता. त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला. यात्रेत विजय जाधव याचे मित्रांबरोबर भांडण झाले. त्यावेळी त्याच्या मित्रां पैकी काही जणांनी विजय जाधव याला लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली होती. अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली. त्यानंतर काल सकाळी विजय जाधव याचा हाथपाय बांधलेला मृतदेह, लाकडी दांडे व चप्पल विहिरीतील पाण्यात आढळून आले. विजय जाधव याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपी राहुल जगधने याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटने बाबत तुकाराम आण्णासाहेब जाधव, रा. आरडगाव. यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर म्हसे, राहुल जगधने व बापू तागड, तिघे रा. शिलेगाव, ता. राहुरी यांच्यावर गुन्हा रजि. नं. 581/2024 भादंवि कलम 302, 34 प्रमाणे खूणाचा गून्हा दाखल करण्यात आला. आरोपी दिगंबर म्हसे व बापू तागड हे दोघेजण पसार झाले असून पोलिस पथके त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी राहुल जगधने याला न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मे 2024 पर्यंत सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे हे करीत आहेत.
COMMENTS