Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतमाल चोरी करणारे आरोपी 12 तासात जेरबंद

कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनची कामगिरी

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणगाव येथील शेतकर्‍याचा शेतमाल चोरी करणार्‍या आरोपीना कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी अव

लहान मुलांवर कोरोना लसीची बारामतीत चाचणी
सुरेगाव शिवारात नऊ एकर ऊस जळून खाक
यंदा आंब्यांच्या झाडांना प्रचंड मोहोर

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणगाव येथील शेतकर्‍याचा शेतमाल चोरी करणार्‍या आरोपीना कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 12 तासात मोठ्या शिताफीने जेरबंद केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की  21 मार्च रोजी रात्री 11 ते  दि 22 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ब्राम्हणगाव गाव येथील  शेतकरी  रमेश भिकाजी आंबीलवादे यांच्या कांद्याचा चाळीतुन 20 हजार रुपये किंमतीचे 4 क्विंटल सोयाबीन व 12 हजार रुपये किंमतीचे  50 किलो गव्हाची गोणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं.145/2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस पथकाकडुन तपास सुरु होता. सदर गुन्ह्याचा तपसा सुरु असताना पोलिस निरीक्षक वासुदेव देसले  यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे ब्राम्हणगाव शिवारात पाटाच्या कडेला संशयीत रित्या फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक  देसले यांनी नमुद ठिकाणी पोलीस कर्मचारी पाठवुन संशयीत आरोपी  संतोष भास्कर पवार (वय-32 वर्ष) शंकर नामदेव माळी, (वय-28 वर्ष) राहुल आप्पा ठाकरे (वय-25 वर्ष) सर्व रा.ब्राम्हणगाव,ता.कोपरगाव यांना चौकशी कामी ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांना विश्‍वासात घेवुन त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनी नमुद सोयाबीन धान्य चोरी केलेबाबत मान्य केले असता त्यांना सदर गुन्हयात अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले व त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्याने रिमांड मुदतीत आरोपीना पोलिसांनी विश्‍वासात घेवून त्यांचाकडे विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल हा आरोपी शंकर नामदेव माळी याचे राहते घरात ठेवला असल्याचे सांगुन आरोपीकडून  सदर गुन्हयातील 20 रुपये किंमतीचे सोयाबीन, 12 हजार रुपये किंमतीचा गहू असा शेतमाल व गुन्हा करताना वापरलेल्या 1 लाख 15 हजार रुपये  किंमतीच्या तीन विना क्रमांकाच्या मोटार सायकली  असा एकुण 1 लाख 36 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शेतक-यांचा जिव्हाळ्याचा शेतमाल चोरीसारखा गंभीर गुन्हा केवळ 12 तासाच्या आत उघडकीस आणला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे सहकारी यांचे व शेतकरी वर्गातुन कौतुक होत आहे. सदरची कौतुकास्पद कामगीरी ही  पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोसई कुसारे, सफौ.ए.एम.आंधळे पोकॉ रशीद शेख, पोकॉ. के.वी.सानप व चालक पोना.साळुंखे यांनी केली आहे.

COMMENTS