जिव्हारी लागलेला आरोप !

Homeताज्या बातम्यादेश

जिव्हारी लागलेला आरोप !

 छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर संस्थानाचा सन्मान आणि आदर महाराष्ट्राच्या सर्व बहुजनांना आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या वारसांनाही तितकाच आदर

आरोग्य सेवा न मिळाल्याने विवाहितेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निषकाळजीपणाचा दोन महिन्यांत दुसरा बळी
सावधान! माळढोक पाठोपाठ लोकशाही संपवण्याचा डाव
अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा:पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

 छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर संस्थानाचा सन्मान आणि आदर महाराष्ट्राच्या सर्व बहुजनांना आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या वारसांनाही तितकाच आदर महाराष्ट्राची जनता आजही देते. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी चुरस होती. परंतु, या चुरशीच्या निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी  अथवा काँग्रेस या कोणत्यातरी पक्षाकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा असलेल्या माजी खासदार संभाजीराजे यांना अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.  त्यांच्या या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. सध्याचे शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांना तिकीट मिळू नये अथवा त्यांनी अपक्ष लढावे, अशी रणनीती भाजपाने तयार केल्याचा आरोप केला आहे. मात्र स्वतः संभाजीराजे यांनी शिवसेनेला यासंदर्भात दोष दिला आहे. वर्तमान शाहू महाराज यांच्या आरोपांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारे हादरा बसला आहे. त्यामुळे त्यांनी शाहु महाराजांचे वक्तव्य हे शिवसेनेकडून स्क्रिप्ट गेली आहे, असा आरोप केला आहे. अशा प्रकारचा आरोप छत्रपतींच्या घराण्याचा अपमान आहे, असा पलटवार देखील सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. या विषयावर आम्ही यापूर्वी लिहिले आहे. संभाजीराजे यांना भाजपने एक प्रकारे मराठा आरक्षणाच्या संदर्भात वापरून घेतले असल्याचाच महाराष्ट्राचा समज झाला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संभाजीराजे यांना राज्यसभेत भाजपाकडून पाठविण्यात आले. याच काळात महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आला होता. त्यासाठी महाराष्ट्रात ५२ मराठा क्रांती मोर्चांचे आयोजनही करण्यात आले होते. या मराठा क्रांती मोर्चाच्या मागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती होती, असा आरोप महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय तज्ज्ञांकडून आजही केला जातो. परंतु, मराठा आरक्षण एका बाजूला भिजत ठेवून  दुसऱ्या बाजूला त्यासाठी आक्रमक धोरण आखुन लढा करणे, अशी भाजपची रणनीती राहिली. या रणनीतीतूनच संभाजीराजे हे खासदार असताना त्यांचा वापर करून घेण्यात आला. छत्रपती शाहू महाराज यांनी महाराष्ट्राला आरक्षणाचे कृतिशील धोरण देऊन उपकृत केले आहे. त्यांच्या या धोरणाला संविधानात समाविष्ट करून स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्ये निर्माण करून सर्वच समाजाला समान संधी देण्यासाठी विशेष आरक्षण धोरण राबवून देशातील समाज एकमय करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच या संपूर्ण आरक्षण धोरणाला शह-काटशहाच्या माध्यमातून एक प्रकारे उद्ध्वस्त केले जात आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न असो अथवा मराठा आरक्षणाचा या दोन्ही प्रवर्गांना एकमेकांविरोधात उभे करण्यातच काही पक्षांना स्वारस्य आहे. संभाजीराजे यांची राजकीय खेळी भाजपाने  केल्याचा स्पष्ट आरोप सध्याचे शाहू महाराज यांनी कालच केला. त्या आरोपात इतकी स्पष्टता होती की त्यामुळे फडणवीस यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले असे सांगून शाहू महाराज यांना कोणीतरी स्क्रिप्ट दिल्याचा आरोपही केला. शाहू महाराजांचा हा आरोप फडणवीस यांना जिव्हारी लागल्याचे त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरून दिसते. खरे तर संभाजीराजे यांनी देखील या एकूण राजकीय खेळी मध्ये आपला वापर होऊ देऊ नये, यासाठी काळजी घ्यायला हवी होती. छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा चालवताना राजकीय सत्तेच्या अधीन न होता आपल्या सामाजिक भूमिकेवरून आपल्या शाहू घराण्याचे वैशिष्ट्य त्यांनी टिकवून ठेवायला हवे, ही महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे!

COMMENTS