Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साकीनाका हत्या प्रकरणातील आरोपींना सहा तासांत अटक

मुंबई : दुचाकीचा धक्का लागल्यामुळे जाब विचारला असता तिघांनी 22 वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरण

कोंबड्यामागं धावण पडलं महागात; बहीण-भावाचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
आता एकनाथ शिंदे झाले शिवसेनेचे गटनेते ? आमदारांनी केली घोषणा | LokNews24
एफआरपी द्या अन्यथा वसुली थांबवा : पाटील

मुंबई : दुचाकीचा धक्का लागल्यामुळे जाब विचारला असता तिघांनी 22 वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी तपास करून सहा तासांत आरोपींना अटक केली. तिघे एकाच दुचाकीवरून प्रवास करीत होते.

मोहम्मद सुहेब ऊर्फ शोहेब सुहेबुद्दीन इमामुद्दीन अन्सारी (वय 22) हा जरीकाम करणारा कामगार होता. तो साकीनाका येथील खैराणी रोड येथून रविवारी दुपारी चालत जात होता. त्यावेळी एस. जे. स्टुडिओ समोर त्याला एका दुचाकीचा धक्का लागला. त्यावेळी अन्सारी त्यांना ओरडला असता आरोपींनी दुचाकी थांबवली. त्यानंतर दुचाकीवरील तिघे खाली उतरले व त्यांनी अन्सारीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. या वादानंतर तिघांनी अन्सारीला मारहाण केली.

संशयितांनी पेव्हर ब्लॉकने अन्सारीला मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे अन्सारी खाली कोसळला. त्यानंतर पादचार्‍यांनी अन्सारीला साकीनाका येथील पॅरामाऊंट रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अन्सारीला मृत घोषित केले. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गोवंडी, शिवाजीनगर येथून अनस शेख (वय 21), गुल्फराज खान (वय 23) व अफजल सय्यद यांना ताब्यात घेतले.

COMMENTS