दरोडा व घरफोडी गुन्ह्यातील सराईत फरार आरोपी जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरोडा व घरफोडी गुन्ह्यातील सराईत फरार आरोपी जेरबंद

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यात दरोडे व घरफोड्यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार सचिन विजय काळे (वय 25, राहणार शेवगाव-पाथर्डी र

अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकर्‍यांचे वीजबिल झाले कोरे
बाजार समितीच्या कारभाराची विकासाकडे वाटचाल: आ. मोनिका राजळे
मनपाच्या प्रोफेसर कॉलनी संकुलात पोटभाडेकरूंचाच दबदबा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यात दरोडे व घरफोड्यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार सचिन विजय काळे (वय 25, राहणार शेवगाव-पाथर्डी रोड, शेवगाव) यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नगरमधून शिताफीने अटक केली. याबाबतची माहिती अशी की, दिनांक 16 जून रोजी ज्ञानेश्‍वर गोवर्धन लोढे (वय 32, रा.मजलेशहर, ता.शेवगाव) हे कुटुंबासह हे सर्व घराबाहेर झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करुन घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 59 हजार रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दिनांक 19 जून रोजी शोभाबाई प्रकाश झुंज (वय 25, रा. हातगाव, ता. शेवगाव) यांच्या घराचा दरवाजा अनोळखी व्यक्तींनी कशाच्या तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश करुन प्रकाश झुंज यांना मारहाण करुन तसेच घरातील लोकांना धमकावून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा असा एकूण 2 लाख 42 हजार रुपयांचा माल जबरीने चोरून नेला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्यानंतर या गुन्हयांच्या तपासामध्ये निष्पन्न आरोपी सचिन विजय काळे हा गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयांतील फरार आरोपी हा अहमदनगर येथे येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल मन्सुर सय्यद, पोलिस नाईक शंकर चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे, कमलेश पाथरुट, आकाश काळे यांनी काळे यास नगर शहरातून अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कारवाई कामी शेवगाव पोलिस ठाण्यात हजर केले आहे.

COMMENTS