Homeताज्या बातम्यादेश

‘एक्स’कडून एका महिन्यात 1.85 भारतीयांचे खाते बंद

नवी दिल्ली ः पूर्वीचे ट्विटर आणि आताचे एक्स या इलॉन मस्कच्या मालकीचे असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका महिन्यात तब्बल 1 लाख 80 हजारांहून अधिक

निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा
भामटे येथे तळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू
स्पीड ब्रेकर व माहिती फलक लावण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

नवी दिल्ली ः पूर्वीचे ट्विटर आणि आताचे एक्स या इलॉन मस्कच्या मालकीचे असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका महिन्यात तब्बल 1 लाख 80 हजारांहून अधिक भारतीय नागरिकांची खाती बंद करण्यात आली आहे. भारतीयांच्या एका चुकीमुळे त्यांचे खाते बंद करण्यात आले आहेत. एक्सने दावा केला आहे की, त्याने 26 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान भारतातील 1 लाख 84 हजार 241 खाती बंदी घातली आहेत. खरं तर, ही खाती कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन करून बाल लैंगिक शोषण आणि एखाद्याच्या संमतीशिवाय त्यांचे खासगी फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करणे किंवा शेअर करणे यांना प्रोत्साहन देत असल्याचे पुढे आले आहे.

एक्सने पुढे असेही म्हटले आहे की, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने या कालावधीत देशातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी 1.303 खाती बॅन केली आहेत. एकूणच, एक्सने या कालावधीत 1 लाख 85 हजार 544 खात्यांवर बंदी घातली आहे. कंपनीने आपल्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने, नवीन आयटी नियम, 2021 अंतर्गत जारी केलेल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, या कालावधीत भारतातील वापरकर्त्यांकडून तक्रार निवारण यंत्रणेद्वारे 18,562 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, कंपनीने खाते बॅन करण्यासंबंधी अपील करणार्‍या 118 तक्रारींवर देखील सकारात्मक कारवाई केली. अनेक खात्यांची तपशीलवार माहिती घेतल्यावर एक्सने चार खात्यांचे निलंबन मागे घेतले. तर उर्वरित खात्यांवर बंदी घातली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. या अहवाल कालावधीत आम्हाला खात्यांबद्दल सामान्य प्रश्‍नांशी संबंधित 105 जणांनी अर्ज केले होते असे अहवालात म्हटले आहे. भारतातील बहुतांश तक्रारी बंदी उल्लंघन (7,555), त्यानंतर द्वेषपूर्ण वर्तन (3,353), संवेदनशील मजकूर (3,335) आणि गैरवर्तन/छळ (2,403) या बद्दल होत्या. 26 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान, एक्सने देशातील 2,12,627 खात्यांवर बंदी घातली. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने त्याच काळात दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या 1,235 खात्यांवर देखील कारवाई करून ही खाती बंद केली होती. अलीकडे, इलॉन मस्कने जाहीर केले की वापरकर्ते आता केवळ स्पॅम आणि बॉट्स टाळण्यासाठी सत्यापित वापरकर्त्यांना उत्तरे मर्यादित करू शकतात.

COMMENTS