Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपर्डीतील युवकाचे अपघाती निधन

कर्जत : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील प्रदीप सुरेश सुद्रिक, वय : 23 या युवकाचे शनिवारी दुपारी अपघाती निधन झाले. दुचाकीवरून घसरून पडून त्याचा अप

खासदार लोखंडे यांचे सोशल डिस्टनसिंग घातक : अँड. पोळ
विधानसभा निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी आ.जगतापांच्या मागे उभे : अ‍ॅड.अभय आगरकर
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक :बिनविरोधचा फुगा अखेर फुटला ; पहिल्याच दिवशी 719 अर्जांची विक्री

कर्जत : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील प्रदीप सुरेश सुद्रिक, वय : 23 या युवकाचे शनिवारी दुपारी अपघाती निधन झाले. दुचाकीवरून घसरून पडून त्याचा अपघात झाला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. नाशिक येथे तो वकिलीचे शिक्षण घेत होता. प्रदिपच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळी कोपर्डीनजीकच्या खिळा वस्ती येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

COMMENTS