बुलढाणा प्रतिनिधी - रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात चाक गेल्याने पाईप घेऊन जाणारे बोलेरो पिक वाहन पलटी झाल्याची घटना बुलढाणा शहरातील तहसी

बुलढाणा प्रतिनिधी – रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात चाक गेल्याने पाईप घेऊन जाणारे बोलेरो पिक वाहन पलटी झाल्याची घटना बुलढाणा शहरातील तहसील चौकात अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे. बोलेरोच्या धडकेने सिग्नल पोल बाजूला जाणाऱ्या ऑटो वर पडला, यामध्ये ऑटो चे मोठे नुकसान झाले, तर सुदैवाने जीवितहानी टळली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याठिकाणी नालीवरील स्लॅब तुटलेला आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणेचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यापुढे होणारे अपघात टाळण्यासाठी स्लॅबचे काम करावे अशी मागणी केली जात आहे.
COMMENTS