नाशिक प्रतिनिधी - घोटी सिन्नर महामार्गावर धामणगांव येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास साई-सर्विस स्टेशनच्या समोर ईको गाडी क्रमांक एम. एच. १५

नाशिक प्रतिनिधी – घोटी सिन्नर महामार्गावर धामणगांव येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास साई-सर्विस स्टेशनच्या समोर ईको गाडी क्रमांक एम. एच. १५ एच. एम.२६५७ व समृद्धी महामार्गाचा हायवे (ट्रक) क्रमांक एम. एच. ४१ ए. यु. ९००१ यांची समोरासमोर धडक होऊन ईको गाडी चालक मधुकर बांडे हे जबर जखमी झाले आहेत. ईको गाडीमध्ये असलेले गणेश पाटील, शांती पाटील, अनिकेत पाटील सर्व रा. भिवंडी व मिराबाई बनकर, नारायण बांडे, लक्ष्मीबाई बनकर सर्व राहणार भरवीर खुर्द हे कीरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना स्थानिकांनी एस. एम. बी. टी ॲम्बुलन्सच्या मदतीने जवळच असलेल्या एस.एम.बी.टी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाहन चालक मधुकर बांडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. संबंधित इको गाडीत असलेले इतर प्रवासी सुखरूप बचावले असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती स्थानिकांनी घोटी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
COMMENTS