सातारा / प्रतिनिधी : वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या दीड महिन्य
सातारा / प्रतिनिधी : वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या दीड महिन्यांमध्ये 1 लाख 15 हजार 780 अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर 10 लाख 5 हजार 783 अकृषक ग्राहकांकडे 1923 कोटी 18 लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीज ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 26) व रविवारी (दि. 27) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. यासोबतच लघुदाब वीजग्राहकांना थकबाकी व चालू बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने 63 हजार 810 घरगुती ग्राहकांकडे 7 कोटी 21 लाख रुपये, 6 हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे 1 कोटी 60 लाख रुपये, 714 औद्योगिक ग्राहकांकडे 78 लाख रुपये तसेच 1415 सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे 18 कोटी 14 लाख रुपये, 4822 पथदिव्यांच्या वीज जोडण्यांकडे 178 कोटी 41 लाख रुपये व इतर अशा एकूण 79 हजार 430 अकृषक ग्राहकांकडे 208 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात 9 हजार 525 थकबाकीदार अकृषक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित झालेला आहे. त्यांच्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेनुसार 100 टक्के व्याज व विलंब आकार माफ करण्यात आले आहे. मूळ थकबाकी भरण्यास सहा हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. एकाच वेळी मूळ थकबाकी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के व लघुदाब ग्राहकांना 10 टक्के थकबाकीमध्ये अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे.
सध्या सुरु असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. थकबाकीदार शेजार्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135/138 नुसार कारवाई करण्यात येत आहे.
COMMENTS