कल्याण प्रतिनिधी - एसी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. तिकीटाचे दर कमी झाल्यापासून अनेकजण

कल्याण प्रतिनिधी – एसी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. तिकीटाचे दर कमी झाल्यापासून अनेकजण गारेगार प्रवासाला पसंती देत आहेत. मात्र, एसी लोकलच्या बाबतीत तांत्रिक बिघाडाचा मुद्दा अधुनमधून उपस्थित होत असतो.गेल्या आठ दिवसा पासून कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी 8.54 च्या एसी फास्ट लोकल ट्रेनचा एक दरवाजा उघडत नसल्याने एन सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना व प्रवाश्याच्या गर्दीच्या वेळी ट्रेन मध्ये चढताना व उतरताना मोठा गोंधळ होत असल्याने संतप्त प्रवाश्यानी रेल्वे प्रशासनाला ट्विटर वरून ट्विट करत दिली तक्रार दिली आहे मात्र प्रवाशांकडून तक्रारी करून रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने एसीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त केली जात आहे.
COMMENTS