Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूल देऊन अल्पवयीन मुलावर अत्याचार

पुणे/प्रतिनिधी ः मनोरुग्णालयात दाखल झालेल्या 16 वर्षीय मुलाला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्य

नव्या शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता
विधानपरिषदेत कोण मांडणार अर्थसंकल्प ?
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याहस्ते अनाथ बालकांना योजनेच्या लाभपत्रांचे वाटप

पुणे/प्रतिनिधी ः मनोरुग्णालयात दाखल झालेल्या 16 वर्षीय मुलाला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याशिवाय त्याच्या हाताला अनेक ठिकाणी सुया टोचल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईने केला आहे. याप्रकरणी नर्ससह पाच जणांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 मे ते 26 जूनदरम्यान घडली आहे.
आरोपी अनिकेत गोखले (25) याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड पोलिसांनी 16 वर्षीय मुलाला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेउन येरवडा बालनिरीक्षणगृहात ठेवले होते. तेथून त्याला मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे अनिकेत गोखले या आरोपीवरही उपचार करण्यात येत होते. संबंधित आरोपीने 16 वर्षाच्या मुलावर रुग्णालयात वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला. त्याने पीडित मुलाला कोणाला काही सांगायचे नाही, अशी धमकी दिली. पीडित मुलाला मनोरुग्णालयात काम करणारी परिचारिका आणि गार्ड त्याला भुलीचे इंजेक्शन देत होते. उपचारानंतर संबंधित पीडित मुलास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. पीडित मुलाच्या आईने त्याला शाळेत प्रवेश घेण्याकरिता कोल्हापूरला नेले. त्या वेळी त्याचा डावा हात सारखा दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करीत एक्स-रे काढला. त्या वेळी मुलाच्या हाताला 18 ठिकाणी सुयांसारखे काही तरी टोचल्याचे दिसून आले. प्रादेशिक रुग्णालयातील परिचारिका व चार गार्डने त्याला इंजेक्शन दिल्याने दुखापत झाल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईने तक्रारीत केला आहे. बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलावरील अत्याचारप्रकरणी तपास केला जात आहे. त्याला अनेक ठिकाणी सुया टोचल्याचे अहवालात म्हटले आहे.

COMMENTS