जामखेड प्रतिनिधी ः तालुक्यातील भवरवाडी येथील विवाहित फिर्यादी महिलेस तिच्या इच्छेविरुद्ध संबध केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी ः तालुक्यातील भवरवाडी येथील विवाहित फिर्यादी महिलेस तिच्या इच्छेविरुद्ध संबध केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना जामखेड येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात घडली आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादीनुसार सदर घटनेतील 22 वर्षीय फिर्यादी पिडीता त्यांच्या राहत्या घरी असतांना आरोपीने घरी येवून तू माझे सोबत शाँपींगसाठी जामखेड येथे चल, तू जामखेडला आली नाही तर मी विषारी औषध घेईल व आत्महत्या करेल अशी धमकी देवून फिर्यादीस जामखेड येथे घेवून जावून 11 एप्रिल 2023 रोजी पहाटे 4: 00 वाजताचे सूमारास जामखेड कर्जत रोडवरील असलेल्या त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथील रूममध्ये घेऊन गेला. तिथे आरोपीने फिर्यादीस तिच्या पतीस जिवे मारण्याची धमकी देवून फिर्यादीच्या इच्छेविरूद्ध बळजबरीने शारिरिक सबंध केले. सदरबाबत कोणाला काही सांगितले तर फिर्यादीस व तिच्या पतीस जिवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. या घटनेतील 22 वर्षीय पिडीता हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अभिषेक उर्फे बच्चन नागु रणसींग रा. भवरवाडी ता.जामखेड याचे विरुध्द भादंवि कलम 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हातील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.
COMMENTS