Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आश्रमातील 3 गतीमंद तरुणींवर अत्याचार

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यातील केडगाव परिसरातील आश्रम शाळेत 3 गतीमंद तरुणींवर मजूर कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीला

मीच “मुख्यमंत्री” आहे हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करावे.
दुधाला 40 रुपये दराच्या मागणीसाठी अकोलेत निदर्शने  
डॉ. विशाल गुंजाळ यांची महाराष्ट्र आय एम ए च्या पदाधिकारी म्हणुन नियुक्ती

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यातील केडगाव परिसरातील आश्रम शाळेत 3 गतीमंद तरुणींवर मजूर कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील केडगाव परिसरात प्रसिद्ध असलेल्या पंडिता रमाबाई महिला आश्रमातील 3 गतीमंद तरुणींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आश्रम शाळेतील मजूर कामगारानेच हा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. मोजस जोरे असे अत्याचार करणार्‍या आरोपीचे नाव आहे. मोजेस हा आश्रम शाळेतील वॉल कंपाऊंड बांधणारा कामगार म्हणून गेल्या तीन महिन्यापासून त्या ठिकाणी काम करत होता. आरोपीने महिला आश्रमातील तीन गतीमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच आरोपीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सातार्‍यामधूनही महिला अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कोळसा कारखान्यात एका आदिवासी महिलेवर 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. 15 दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे पीडित महिलेने आपल्या जबाबात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

COMMENTS