अबू सालेमला जन्मठेप भोगावीच लागणार ; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अबू सालेमला जन्मठेप भोगावीच लागणार ; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

नवी दिल्ली मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोटांचा आरोपी अबू सालेम याला झालेली जन्मठेपेची शिक्षा योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. साले

एसटी संपत सामील झाल्याने वरिष्ठांकडून त्रास; एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न | LOK News 24
पुणतांब्यात शासन आपल्यादारी उपक्रम उत्साहात
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने…

नवी दिल्ली मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोटांचा आरोपी अबू सालेम याला झालेली जन्मठेपेची शिक्षा योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. सालेम याने या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान 25 वर्षांचा कारावास पूर्ण झाल्यावर सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असे कोर्टाने म्हटले आहे.
मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह त्याच्या साथीदारांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. अबू सालेम आणि करिमुल्लाला यांना जन्मठेप, तर ताहीर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर रियाज सिद्दीकीला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, त्याला पोर्तुगालमधून भारतात आणताना जो हस्तांतरण करार झाला होता, त्यानुसार अबू सालेमला फाशी किंवा 25 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा देता येणार नव्हती. त्यामुळं अबू सालेमला जास्तीत जास्त 25 वर्षे शिक्षा देण्यात आली. त्यामुळे अबू सालेमला 25 तुरुंगात काढावी लागणार आहेत.

COMMENTS