Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कडकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्लीत

नाशिक : काही आठवड्यांपूर्वीच नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेला कुख्यात गँगस्टर व मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अ

जरांगे पाटील मुळात: आरक्षण विधेयक !
इंधन दरानंतर खाद्य तेलांच्या किंमतीत घसरण
नारायण टेक्नो नांदेड या शाळेस शासनाची मान्यता नाही

नाशिक : काही आठवड्यांपूर्वीच नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेला कुख्यात गँगस्टर व मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास गुरुवार, दि. 1 पहाटे कडेकोट बंदोबस्तामध्ये रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले. याबाबत कारागृह प्रशासन व पोलिसांकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. दिल्ली येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजानंतर अबू सालेम यास परत आणले जाईल, असे नाशिक मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गेल्या जुलै महिन्याच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आबू सालेम यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आलेले होते. सालेम सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे तर अन्य गंभीर स्वरुपाचे खटलेही प्रलंबित आहेत. त्यातील काही खटल्यांची सुनावणी दिल्ली येथील न्यायालयात सुरू आहे.

COMMENTS