नवी दिल्ली: महापालिका निवडणुकीच्या 80 दिवसांनंतर दिल्लीला नवा महापौर मिळाला आहे. आम आदमी पार्टीच्या (आप) शैली ओबेरॉय यांची महापौरपदी निवड झाली आह
नवी दिल्ली: महापालिका निवडणुकीच्या 80 दिवसांनंतर दिल्लीला नवा महापौर मिळाला आहे. आम आदमी पार्टीच्या (आप) शैली ओबेरॉय यांची महापौरपदी निवड झाली आहे. शैली यांना 150 मते मिळाली असून त्यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला आहे.
दिल्लीला 10 वर्षांनंतर महिला महापौर मिळाल्या आहेत. यापूर्वी 2011 मध्ये भाजपच्या रजनी अब्बी या शेवटच्या महिला महापौर होत्या. यानंतर 2012 मध्ये शीला दीक्षित सरकारमध्ये दिल्ली महापालिकेची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. परंतु, 2022 मध्ये हे भाग पुन्हा एकत्र आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. दिल्लीत एमसीडीच्या निवडणुका 4 डिसेंबर 2022 रोजी पार पडल्या, तर त्यांचे निकाल 8 डिसेंबरला आले. एमसीडी निवडणुकीत गेल्या 15 वर्षात भाजपला बहुमत न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूण 250 जागांच्या सभागृहात महापौर होण्यासाठी 138 मतांची गरज होती. महापौरपदाच्या निवडणुकीत 241 नगरसेवक, 10 खासदार आणि 14 आमदारांनी मतदान केले. काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी निवडणुकीत भाग घेतला नाही.
COMMENTS