जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील खडकी या गावात हा प्रकार घडला

 हिंगोली  प्रतिनिधी - राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातत्याने मारहाणीच्या, हत्येच्या, बलात्काराच्या, खुनाच्या घटना समोर य

इंजेक्शनची सुई 5 महिने मांडीतच
पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका पोलिस अधिकार्‍यांनाच
न्यायाधीशांच्या नियुक्त्यामध्ये सरकारची भूमिका हवी

 हिंगोली  प्रतिनिधी – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातत्याने मारहाणीच्या, हत्येच्या, बलात्काराच्या, खुनाच्या घटना समोर येत आहेत. यातच आता हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल माडियावर व्हायरल होत आहे.हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील खडकी या गावात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रामकिसन हराळ असे या मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. जागेच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी मारहाण झालेल्या व्यक्तीला तत्काळ सोडवून याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर या आरोपींना अटक देखील झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS