Homeताज्या बातम्यादेश

लग्नास नकार दिल्याने तरुणीची भररस्त्यात हत्या

अमृतसर : पंजाबच्या मोहालीमध्ये लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीची भररस्त्यात तलवारीने हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बिहारमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या
पुण्यात गाडी घासल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
पुण्यात सलग तिसर्‍या दिवशी एका तरूणाची हत्या

अमृतसर : पंजाबच्या मोहालीमध्ये लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीची भररस्त्यात तलवारीने हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत तरुणी कामवर जात असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. बलजिंदर कौर (वय, 26) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर, अटक करण्यात आलेल्या आरोपीची अद्याप उघड झाली नाही. बलजिंदर बँकेत ड्युटीवर जात असताना आरोपीने तिच्यावर तलवारीने हल्ला केला.

COMMENTS