नाशिक प्रतिनिधी - नाशिकमध्ये दांडिया खेळायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. दांडिया खेळताना किरकोळ वाद होऊन बाचा
नाशिक प्रतिनिधी – नाशिकमध्ये दांडिया खेळायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. दांडिया खेळताना किरकोळ वाद होऊन बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ होऊन अखेर तरुणाला धारदार शस्त्राने भोसकण्यात आलं होतं. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरु होती. पण अखेर ही झुंज अपयशी ठरली असून तरुणाने जीव गमावलाय. यानंतर हत्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी चार जणांना अटक केलीय. पुढील तपास केला जातोय.

COMMENTS