Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये पोलिस चौकीसमोरच तरुणावर कोयत्याने वार

बीड : राज्यात सध्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्यानंतर बीड जिल्हा चर्चेत असतांनाच बीडमध्ये चक्क पोलिस

सुषमा अंधारे आमदार शिरसाटांवर ठोकणार तीन रूपयांचा दावा
Beed : धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा | LOKNews24
शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे – कृषीमंत्री मुंडे

बीड : राज्यात सध्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्यानंतर बीड जिल्हा चर्चेत असतांनाच बीडमध्ये चक्क पोलिस चौकीसमोरच तरूणावर कोयत्याने वार केल्यची घटना गुरूवारी उघडकीस आल्याने मोठी खळबख उडाली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाजवळील पोलिस चौकीच्या समोरच एका तरुणावर चौघांनी चाकू आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
जमीरचा भाऊ शेख मतीनने दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीहरी मुंडे हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. यावेळी जमीरने त्यास नकार देऊन त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर गुरूवारी रात्री 12.30 वाजता जमीर स्वाराती रूग्णालयासमोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडे याने त्यास पोलिस चौकीजवळील एटीएमसमोर बोलावले. जमीर तिथे जाताच श्रीहरीने शिवीगाळ का केली असा जाब विचारत जमीरच्या मानेवर चाकूने वार केला. आरोपीसोबत असलेल्या आर्यन मांदळे आणि इतर दोघांनी कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे, आर्यन मांदळे आणि इतर दोन अनोळखी तरुणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

COMMENTS