Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जत तालुक्यात तरूणाची दगडाने ठेचून हत्या

सांगली/प्रतिनिधी ः सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली खूनाची मालिका काही संपण्याची चिन्हे नाही. 15 दिवसांपूर्वी एक हत्या झाल्या

पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
उद्योजकाला प्रेमात अडकवून उकळले सव्वा कोटी
पैशांसाठी स्वतःच्या पत्नीला दिले मित्रांच्या तावडीत

सांगली/प्रतिनिधी ः सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली खूनाची मालिका काही संपण्याची चिन्हे नाही. 15 दिवसांपूर्वी एक हत्या झाल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आणखी एकाची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या यल्लमा रोडजवळ एका तरुणाची गळा चिरुन आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, शशिकांत बिरा मदने (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून घरापासून काही अंतरावर शेतात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. सकाळी हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जत शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला आहे. शशिकांत मदने हा ट्रॅक्टर चालक असून, या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जत शहरात मोठ्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोसारी येथे दोघा जणांची हत्या झाली होती. त्या पाठोपाठ जत शहरामध्ये भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खुनाची घटना घडली होती. यानंतर आता आणखी एका तरुणाची निर्घृण हत्येची घटना घडल्याने जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS