Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासगी सावकारीतून तरूणावर शस्त्राने वार

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी फॅक्टरीतील तरुणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.हा प्रकार खाजगी सावकारीतून घडला असल्याचे बोलले जात

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची विवेक कोल्हे यांनी केली पाहणी
मोठी घडामोड… शिवसेनेचे शहरप्रमुख गेले थेट शरद पवारांच्या भेटीला
कनिष्ठ शाखा अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी फॅक्टरीतील तरुणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.हा प्रकार खाजगी सावकारीतून घडला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात संगमनेर येथील सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                        राहुरी फॅक्टरी येथील सुशांत केदारी हे सायंकाळी साडे सात वाजता वाणी मळा येथील हॉटेलवर जेवणासाठी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या शाम माणिक लोखंडे, यश शाम लोखंडे राहणार संगमनेर व अनओळखीचे पाच ते सहा व्यक्तींनी सुशांत केदारी याच्या छातीवर, पोटावर, व उजव्या हाताच्या दंडावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली तर यश लोखंडे याने आपल्या हातातील लाकडी दांड्याने मानेवर मारहाण केली. शिवीगाळ दमदाटी करत लाथा बुक्यांनी मारहाण करून पुन्हा संगमनेर येथे दिसला तर जिवे मारून टाकू अशी धमकी दिली. दरम्यान जखमी सुशांत केदारी याच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकोन्स्टेबल दिनकर गर्जे हे करीत आहे.

COMMENTS