पुणे ःपंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय महिला मंत्र्यांचे व्हिडिओ-फोटो मॉर्फ त्यांची करून देशभरात बदनामी

पुणे ःपंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय महिला मंत्र्यांचे व्हिडिओ-फोटो मॉर्फ त्यांची करून देशभरात बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका विकृत मानसिकतेच्या तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सायबर विभागाने अटक केली आहे.
शमीम जावेद अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांचं नावं असून त्याला झारखंड राज्यातील रांची मधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी पिंपरी चिंचवड सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर तब्बल तीन महिने तपास करून सायबर पोलीस या तरुणापर्यंत पोहोचले आहेत. मात्र आरोपीने तक्रार करणार्या माजी खासदार अमर साबळे यांचे फेसबुक अकाउंटही हॅक केल अशी माहिती अमर साबळे यांनी दिली आहे. तर संबधित तरुणाला सोमवारी पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आल्या नंतर कोर्टाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
COMMENTS