Homeताज्या बातम्यादेश

उंच दोरीवरून चालताना खाली कोसळला तरुण

सर्कसमधील कलाकारांचे आयुष्य म्हणजे जीवन- मरणाची लढाई. अनेक थरारक, जीवघेणे स्टंट करत हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. मात्र अनेकदा हे स्ट

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ ः पंतप्रधान मोदी
Aurangabad : “या” मातेवर आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ
Belapur : बेलापुरात भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव सुरु (Video)

सर्कसमधील कलाकारांचे आयुष्य म्हणजे जीवन- मरणाची लढाई. अनेक थरारक, जीवघेणे स्टंट करत हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. मात्र अनेकदा हे स्टंट फसतात ज्यामुळे मोठे अपघातही होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका सर्कसमधील तरुणाचा अपघात झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयानक घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भीषण अपघात, जीवघेणे स्टंट, तर कधी मारहाणीच्या घटना पाहून नेटकऱ्यांचीही भितीने गाळण उडते. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दोरीवरुन चालणाऱ्या सर्कसमधील कलाकाराचा तोल गेल्याने हा अपघात झाला.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोकळ्या जागेत ही सर्कस भरवल्याचे दिसत आहे. हा खेळ पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी केली असून मोठे बांबु उभारल्याचे दिसत आहे. यावेळी जमलेल्या लोकांना आपली कला दाखवण्यासाठी उंच दोरीवर चढतो. मात्र अचानक उभारलेले बांबू निसटतात आणि हा तरुण एवढ्या उंचीवरुन खाली कोसळतो

COMMENTS