तराफे वाचवण्याच्या नादात तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तराफे वाचवण्याच्या नादात तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत.

राजू चव्हाण असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव

नांदेड  प्रतिनिधी- नांदेड(Nanded) जिल्ह्यातील हदगाव(Hadgaon) तालुक्यात एका 17 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. तराफे वाचवण्याच्या नादात या तरुणाचा

कंगना रणौतने घेतले त्र्यंबकेश्वरचे दर्शन
आमदार बंब आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
विराट कोहलीचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम

नांदेड  प्रतिनिधी- नांदेड(Nanded) जिल्ह्यातील हदगाव(Hadgaon) तालुक्यात एका 17 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. तराफे वाचवण्याच्या नादात या तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला. या 17 वर्षाय तरुणाचं नाव राजू चव्हाण आहे. हि घटना हदगावच्या उंचाडा येथील कयादू नदीत घडली. वाळू काढण्यासाठी लागणाऱ्या तराफ्यांवर कारवाई केली जाईल, या भीतीने राजू ते वाचवण्यासाठी नदीत उतरला होता. तराफे लपवण्यासाठी पोहत जात असताना राजूचा पाय अडकला आणि तो बुडाला. दरम्यान, हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी पोलीस आणि महसूल विभागाकडून सारवासारव सुरु असल्याचीही चर्चा आहे. 

COMMENTS