नायगाव प्रतिनिधी - नायगाव तालुक्यातील कोलंबी शिवारात हळदा रस्त्यावर शेताकडे जागली साठी जाणार्या युवक सदानंद शिवाजी सोनमनकर रा.कोलंबी वय 23 वर्ष

नायगाव प्रतिनिधी – नायगाव तालुक्यातील कोलंबी शिवारात हळदा रस्त्यावर शेताकडे जागली साठी जाणार्या युवक सदानंद शिवाजी सोनमनकर रा.कोलंबी वय 23 वर्ष या युवकाचा रानडुकाराच्या हल्यात जखमी होऊन उपचारा दरम्यान खाजगी रुग्णालय नांदेड येथे 30 मे रोजी मृत्यू सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला त्यांच्या पार्थीवावर 31 मे रोजी सकाळी 11वा कोलंबी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने कोलंबी गावावर शोककळा पसरली आहे.
कोलंबी गावचे माजी सरपंच शिवाजी नारायण पा.सोनमनकर यांना दोन मुले यातील वडील मुलगा सदानंद शिवाजी सोनमकर हा कर्ता होता विशेष म्हणजे त्यांचे लग्न जमले होते.येत्या काही दिवसात मामा च्या मुली सोबत लग्न होते.त्या दृष्टीने तयारी चालू होते.तो शेताकडे लक्ष देत असे.29मे रोजी हळदा रस्त्यावर असलेल्या शेताकडे जागली ला रात्रीचे पाणी देण्यासाठी जात होता.रस्त्यावरून पायी जाताना रानडुकराने धडक दिल्याने सदानंद जाग्यावर डोक्यावर पडला.आरडा ओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले वाहन करून गावात आणल्या नंतर जखमी सदानंद ला सरपंच व ग्रामस्थांनी नांदेड येथील कोउठा भागतील दवाखण्यात दाखल केले 30 रोजी सकाळी मेंदुवरशस्त्रक्रिया करण्यात आली.परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही सायंकाळी पाच वाजता निधन झाले. 31 मे रोजी शासकीय ग्रामीण रुग्णांलय नांदेड येथे शवविच्छेदन करून सकाळी 11वा.कोलंबी ता.नायगाव येथे ग्रामस्थ व तालुक्यातील राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.सदानंद हा अतिषयगुणी व खाटपट्या मुलगा होता.तो माजी सरपंच शिवाजी पाटील सोनमनकर,यांचा जेष्ठ मुलगा तर माजी भास्कर पत संस्थेचे चे संचालक बालाजी नारायण सोनमनकर,माजी सरपंच प्रतिनिधी तथा मु.अ.अशोक नारायण सोनमनकर व देविदास सोनमनकर यांचा पुतण्या होय.
COMMENTS