Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

मुंबईः वडाळा पूर्व येथील मुंबई पोर्ट ट्रस्टजवळ (एमबीपीटी) महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेच्या डोक्यात प्रहार करून तिची हत्या करण्यात आल्याचे

खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन
आदीवासींना न्याय मिळवून दिला ः डामोर
माण देशी चॅम्पियन्सच्या उपक्रमामुळे म्हसवडमध्ये जलतरण स्पर्धा; राज्यातील लोकांमध्ये आश्‍चर्य

मुंबईः वडाळा पूर्व येथील मुंबई पोर्ट ट्रस्टजवळ (एमबीपीटी) महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेच्या डोक्यात प्रहार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर एमबीपीटी परिसरात मृतदेह आणून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. एमबीपीटी प्रवेशद्वार क्रमांक 4 व 5 च्या दरम्यान जळालेल्या गोणीत गुरुवारी या महिलेचा मृतदेह सापडला. याबाबतची माहिती मिळताच वडाळा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पण ती 35 ते 40 वयोगटातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महिलेच्या डोक्याला गंभीर जखमा आहेत. याशिवाय हाताचे दोन्ही कोपर व पायाचे गुडघे तुटलेले आहेत. याशिवाय शरीर पूर्ण जळाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोणीत भरून मृतदेह घटनास्थळी आणून तो जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेचा मृतदेह परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आला असून तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिसांना महिलेच्या हातात अंगठी व कानात कर्णफुले सापडली आहेत. त्याद्वारे तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रणाच्या मदतीने संशयीत आरोपीची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकार्‍याने सांगितले. वडाळा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS