Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टायर फुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरालगत ढुस वस्ती जळील अग्नि मंदिर समोर श्रीरामपूर रस्त्यावर कारचे चालकाच्या बाज

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
निंबोडीजवळ गाडीची झाडाला धडक
भरधाव वेगातील कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरालगत ढुस वस्ती जळील अग्नि मंदिर समोर श्रीरामपूर रस्त्यावर कारचे चालकाच्या बाजुचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंञण सुटल्याने राहुरीच्या दिशेने येणार्‍या मोटारसायकलवर हि कार धडकली. झालेल्या भीषण अपघातात मायलेक गंभीर जखमी झाले. उपचारासाठी नेत असताना आईचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. असून मुलाची मात्र मृत्यूशी झुंज सुरू आहे. या अपघातातील तरुणाचा एक हात व एक पाय निकामी झाला आहे.
            याबाबत सविस्तर माहिती अशी की,श्रीरामपूर राहुरी फॅक्टरी रस्त्यावर देवळाली प्रवरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर बुधवारी  सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान इंडिगो सीएस क्रमांक एम एच 16 एक्स 6040 व दुचाकी क्रमांक एम एच 16 ऐपी 358 या  वाहनामध्ये भीषण अपघात झाला. माय-लेकाला जोराची धडक दिली.सुमारे रस्त्यावरुन तीस फुट शेतात फेकले गेले.या अपघात जखमी झालेले अभिजित पोपट वाघमारे (वय.16) तर मयत महिला संगिता पोपट वाघमारे (वय 45 दोघे रा. कोंची मांची तालुका संगमनेर)नागरिकांनी अँम्बुलसला फोन केल्यानंतर रवी देवगिरे, पप्पू कांबळे व अँम्बुलन्स चालक नागरिकांच्या मदतीने या दोघांना राहुरी फॅक्टरी येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये मायलेकांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर काही सुज्ञ नागरिकांनी अपघातील महिलेस  उपचारासाठी विळद घाट येथे हलवण्यात आले होते. उपचारास नेत असताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सदर युवक मृत्यूशी झुंज देत आहे. अपघात झाल्यानंतर परीसरातील नागरिकांनी मदत करण्यासाठी धाव घेतली. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी झाली होती.

COMMENTS