छ. संभाजीनगर ः साडूचा बाराव्याचा कार्यक्रम आटोपून मुंबईला निघालेल्या वृद्ध दांपत्याला शहरातील आकाशवाणी चौक ओलांडताना गॅस सिलिंडच्या ट्रकने उडवले.

छ. संभाजीनगर ः साडूचा बाराव्याचा कार्यक्रम आटोपून मुंबईला निघालेल्या वृद्ध दांपत्याला शहरातील आकाशवाणी चौक ओलांडताना गॅस सिलिंडच्या ट्रकने उडवले. त्यात पत्नीचा जागीच मृत्यू, तर पती गंभीर जखमी झाला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ट्रकने या दांपत्याला तब्बल 40 फूट फरफटत नेले. विशेष म्हणजे ट्रक सिग्नल तोंडून सेव्हन हिल्सकडे जात होते. अनिता येतिराज बाहेती (65, रा. डोंबिवली) असे मृत महिलेचे नाव आहे. येतिराज बाहेती (67, रा. डोंबिवली) हे अपघातात गंभीर जखमी झाले.
COMMENTS