Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून यंदा कार्यक्रमांची रेलचेल

पुणे ः भारतातील पहिला सार्वजनिक गणपती ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ च्यावतीने यंदा गणेशोत्सवात विविध पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक

मुख्याध्यापकासह शिक्षक दारु पिऊन शाळेत
शारदा शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिवादन  
31 मार्चअखेर यशवंत बँकेचा 360 कोटींचा एकत्रित व्यवसाय; बँकेस 2 कोटी 8 लाखांचा ढोबळ नफा : शेखर चरेगांवकर

पुणे ः भारतातील पहिला सार्वजनिक गणपती ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ च्यावतीने यंदा गणेशोत्सवात विविध पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महिला आणि विद्यार्थ्यांच्या अथर्वशीर्ष पठणापासून तर रिल स्पर्धा आणि आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. ट्रस्टचे विश्‍वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे. यामध्ये गणेश चतुर्थीला भव्य मिरवणुकीने या गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुसर्‍या दिवशी पासून शालेय विद्यार्थ्यांच्या भेटी तसेच अथर्वशीर्ष पठण होणार आहे. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत, गणेशोत्सवाच्या दहा दिवसात विविध नामांकित शाळांचे विद्यार्थी बापाच्या दर्शनासाठी येणार असून भाऊसाहेब रंगारी वाड्याला भेट देऊन स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी दिलेले योगदान आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात यासंबंधीचा इतिहास समजून घेणार आहेत. गणेश भक्तांसाठी दि. 20 ते 26 सप्टेंबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

COMMENTS