Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्याच्या कडेला उभ्‍या असलेल्या चिमुकल्याला कारने चिरडले

बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना

बीड प्रतिनिधी  -  पैठण- बारामती रस्त्याच्या कडेला उभ्‍या असलेल्‍या चिमुकल्याला भरधाव कारने चिरडल्याची हृदयद्रावक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील क

बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळली; ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
55 प्रवाशांनी भरलेली बस बुलढाण्याच्या घाटात पलटली
सोलापुर-पुणे महामार्गावर भिषण अपघात ः 4 ठार

बीड प्रतिनिधी  –  पैठण- बारामती रस्त्याच्या कडेला उभ्‍या असलेल्‍या चिमुकल्याला भरधाव कारने चिरडल्याची हृदयद्रावक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथे घडली.आष्टी तालुक्यातील कडा येथील संतोष मोटे हे हॉटेल व्यवसायिक असल्याने रात्री हॉटेल बंद करून घराकडे पत्नी व 2 मुलांसह जात होते. काही कामानिमित्त रस्त्याच्या कडेला थांबले. यावेळी अचानक धामणगावकडून कड्याकडे येत असलेल्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या रुद्राला जोरदार धडक दिली. यात रुद्र गंभीर जखमी झाला.दरम्यान रुद्रा या चिमुकल्याला अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामूळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


 

COMMENTS